रोहतकहून दिल्लीला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनमध्ये स्फोट; अपघात की कट?, उच्चस्तरीय चौकशी सुरू

    29-Oct-2024
Total Views |
grp-rpf-start-investigation
 

मुंबई :       रोहतकहून दिल्लीला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनमध्ये झाल्याची घटना दुपारी ४.२० च्या सुमारास घडली. दि. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी ट्रेन नियोजित वेळेनुसार जिंदहून दिल्ली रवाना झाली. सांपला स्टेशनहून पुढे खरखोडा आणि रोहाड दरम्यान पोहोचताच मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे डब्ब्यातून प्रवाशांना ठिणग्या येताना दिसल्या. त्यानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून उड्या मारत आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न केला.




दरम्यान, रोहतकमध्ये पॅसेंजर ट्रेनमध्ये स्फोट झाल्यानंतर प्रवाशांमध्ये मोठाच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. घटनेवेळी प्रसंगावधान दाखवत लोको-पायलटने आपत्कालीन ब्रेक लावून ट्रेन थांबवली. या अपघातात ४ जण जखमी झाले असून अद्याप कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच, जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महत्त्वाचे म्हणजे हा स्फोट अपघात होता की सुनियोजित कट याचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.

दरम्यान, मागील काही काळात वाढत्या रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रशासन यंत्रणा सखोल चौकशी करत आहे. स्फोटाची माहिती नियंत्रण कक्षाला देण्यात आली असून रेल्वे अधिकारी आणि पोलिस विभागाशी संबंधित यंत्रणा घटनास्थळी पोहोचले. ही घटना अपघात की कटकारस्थान याचा उच्चस्तरीय तपास सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटात सल्फर आणि पोटॅश गॅसचा वापर करण्यात आला आहे.