'उबाठा'ने जाहीर केलेला उमेदवार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

    28-Oct-2024
Total Views |
ubt gut candidate party leave


मुंबई :    'उबाठा' गटाने छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून जाहीर केलेल्या उमेदवाराने उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. किशनचंद तनवाणी असे या उमेदवाराचे नाव असून, त्याने उमेदवारी परत केली आहे. ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरेंसाठी हा धक्का मानला जात आहे.


उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी जाहीर केली. शिवसेनेने प्रदीप जैस्वाल यांना, तर 'एमआयएम'ने नासेर सिद्दिकी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या मतांमध्ये विभागणी होऊन 'एमआयएम'चा उमेदवार निवडून आला होता. तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी आपण माघार घेत असल्याचे किशनचंद तनवाणी यांनी स्पष्ट केले आहे.