मेक इन इंडियाची गरूडझेप! मोदी आणि सांचेझ यांच्या हस्ते टाटा एरक्राफ्ट कॉम्पलेक्सचे उद्धाटन
28-Oct-2024
Total Views |
गांधीनगर : स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमावेत गुजरात मध्ये ते विविध प्रकल्पांचे उद्धाटन करणार आहेत. या दरम्यान, त्यांनी वडोदरा येथील टाटा एरक्राफ्ट कॉम्पलेक्सचे उद्धाटन देखील केले. या एरक्राफ्ट कॉम्पलेक्समध्ये सी २९५ प्रोग्रामच्या अंतर्गत ४० रणनीतिक वाहतूक विमानांची निर्मीती भारतात होणार आहे.
सी २९५ प्रोग्रामच्या अंतर्गत भारताला स्पेन कडून १६ विमानं मिळणार असून, उरलेल्या ४० विमानांची निर्मीती भारत करणार आहे. भारतीय सैन्यासाठी खासगी क्षेत्रामार्फत केलेली ही पहिलीच भारतीय निर्मीती आहे. यामध्ये निर्मीती पासून ते चाचणी, डीलव्हरी, आणि विमानाच्या संपूर्ण मेंटेनंसची खबरदारी या टाटा एरक्राफ्ट कॉम्पलेक्समध्ये घेण्यात येईल. या उद्धाटनाच्या वेळीस पंतप्रधान मोदी म्हणाले " टाटा एरक्राफ्ट कॉम्पलेक्सच्या माध्यमातून भारत आणि स्पेन यांच्या मैत्री अधिक दृढ होणार आहे. मेक इन इंडीया आणि मेक फॉर वलर्डच्या दिशेने घेतलेली ही यशस्वी झेप आहे ."
रतन टाटा यांच्या विषयी बोलताना मोदी म्हणाले " नुकतेच आपण देशाचे महान सुपुत्र रतन टाटा जी यांना गमावले. आज तो आपल्यात असते तर त्यांना आनंदा झाला असता. कार्यक्रमाच्या वेळीस २०१२ सालीच ही कल्पाना रतन टाटा यांनी मांडली होती याचा आवर्जून उल्लेख केला. " या प्रकल्पाची मूळ कल्पना एका दशकाहून अधिक काळापूर्वी, २०१२ मध्ये टाटा सन्सचे तत्कालीन अध्यक्ष, रतन टाटाजी यांनी मांडली होती. एअरबसशी संबंधीत निर्मीतीचे संकल्पनेचे नेतृत्व टाटा यांनी केले. आज हा प्रक्लप उभा राहतो आहे तो टाटा यांनी केलेल्या पायाभरणी मुळे. या अत्यंत पथदर्शी उपक्रमात त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वासाठी मी त्यांचे स्मरण करू इच्छितो"
टाटा म्हणजे शिखररत्न
कार्यक्रमाच्या दरम्यान, आपल्या प्रतिक्रीया व्यक्त करताना, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ म्हणाले " आज या उपक्रमामुळे, युरोपच्या इतर कंपन्यांसाठी भारताचे समृद्ध दालन खुले होईल. या प्रकल्पामुळे दोन वेगळ्या देशांतील समृद्ध गोष्टींचा संगम होईल. टाटा म्हणजे औद्योगिक साम्यर्थचे प्रतीक आहे. टाटा कंपनीचे प्रोडक्टस जगाच्या बाजारपेठेत लोकांसाठी उपल्बध असतात. टाटा म्हणजे जणू एखादे शिखररत्न आहेत. हा प्रकल्प म्हणजे दोन्ही देशांमधील विश्वासार्हता आणि धोरणात्मक भागीदार म्हणून संबंध मजबूत करण्याची संधी आहे.