शेअर्स सूचीबध्द होताना १० टक्के घसरण; ग्रे मार्केट अंदाजानुसार अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी

    28-Oct-2024
Total Views |
shares ipo listing gray market


मुंबई :     
वारी एनर्जीज लिमिटेडचे समभाग आज शेअर बाजारात सूचीबध्द झाल्यानंतर मोठी घसरण झाली. वारी लिमिटेडचा आयपीओ २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान सबस्क्रिप्शन खुला होता. त्यानंतर सुचीबध्द होताना वारी लिमिटेड सकाळच्या सत्राात जोरदार आपटल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे ग्रे मार्केटमधील आकडे पाहता वारी लिमिटेडचे समभाग पडण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांनी व्यक्त केली होती.


हे वाचलंत का? -     यंदा गुंतवणूकदार अनुभवणार 'आयपीओ'वाली दिवाळी; जाणून घ्या संपूर्ण तपशील


वारी एनर्जीचे शेअर्स सूचीबद्ध झाल्यानंतर १० टक्क्यांनी घसरला असून समभागाची किंमत २,२९४.५० वर पोहोचली. गुंतवणूकदारांनी केलेल्या प्रॉफिट बुकींगमुळे ही घसरण झाली असून कंपनीचे शेअर्स बीएसई वर २,५५० वर ओपन झाला असून १,५०३ च्या आयपीओ वाटप किमतीपेक्षा ६९.६६ टक्के जास्त आहे. एनएसई शेअर्स २,५०० वर इंट्री बाजारात घेतली. ६६.३३ टक्के प्रीमियम दर्शविते.

एकंदरीत, ग्रे मार्केटमधील आकडे पाहता कंपनीचे शेअर कितीला बाजारात लिस्ट होणार आहे, याकडे बाजारातील तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. तथापि, ग्रे मार्केट अपेक्षेपेक्षा सूचीची कामगिरी कमी झाली. Vaari Energies चे अनलिस्टेड शेअर्स ग्रे मार्केटमध्ये १,२७५ च्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत होते, आयपीओ सबस्क्रिप्शन किंमतीपेक्षा ८४.८३ टक्के प्रीमियम दर्शविते. वारी लिमिटेड आयपीओला ९७.३४ लाख अर्जांचा प्रतिसाद मिळाला.