
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींचा धुरळा सगळीकडे पसरला आहे. उमेदवारांची घोषणा, क्रमाक्रमाने पक्षाच्या येणाऱ्या याद्या, नाराजीनाट्य हे सगळीकडे बघायला मिळतो आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा आणि मुख्यमंत्री पदावरून रंगणारी संगीतखुर्ची यामध्ये आता नवीनच प्रश्नाची भर पडली आहे. इतर राज्यांमध्ये गळ्यात गळे घालून मिरवणारे सपा-काँग्रेस महाराष्ट्रात वेगळे होण्याची चिन्हं दिसत आहेत. या सपाचे वाचाळवीर, अबू आझमी सात ते आठ आमदारांच्या जीवांवर हिंदू समाजाला धमकी देत होते.
महाविकास आघाडीचे जणू सैन्यच आपल्या पाठीशी उभे आहेत अशा थाटात, अबू आझमी फिरत होते. पण आता त्यांच्या वाट्याला भोपळाच येण्याची शक्यता अधिक आहे. महाविकास आघाडीचे शिरशस्थ नेतृत्व करणारे शरद पवार यांनी यावर भाष्य करण्याचे टाळले असून, आघाडी मध्ये सगळ्यांनी एकत्र राहावे ही इच्छा व्यक्त केले आहे. आताच्या घडीला काय परिस्थीती आहे हे लक्ष्यात घेतल्यास चित्र स्पष्ट होईल. महाविकास आघाडीने परस्पर जागांचे वाटप केले असून, समाजवादी पक्षाच्या मागणीकडे कुठल्याही प्रकारे लक्ष्य दिलेले नाही. यानंतर, समाजवादी पक्षाच्या लोकांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली. परंतु काही क्षणातच, आपल्या भूमिकावरून कोलांटी उडी घेतली आणि आघाडीच्या सोबत आहोत असे जाहीर करून टाकले. सपा ची लाख इच्छा असली तरी, महाविकास आघाडीला नवा जोडीदार नको असेल तर कोण काय करणार.
महाराष्ट्रात समाजवादीचे भविष्य अंधारात
अखिलेश यादव महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना, स्वरा भास्कर या अभिनेत्रीचे पती फहाद अहमाद कायम त्यांच्या सोबत असायचे. समाजवादी पक्षाच्या युथ विंगचे ते अध्यक्ष होते. अणु शक्ती नगर मधून उमेदवारी मिळावी म्हणून अनेकदा अहमद यांनी लखनऊला खेटे घातले. त्यांच्या बायकोने सुद्धा या कामात त्यांची मदत केली. परंतु, समाजवादी पक्षाने त्यांना अपेक्षित ती दाद दिली नाही. परंतु ही निराशा फार काळ राहिली नाही. सुप्रिया सुळे यांच्या साह्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली. नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांच्या विरोधात अहमद निवडणूक लढवणार आहे. पक्षाला राम राम ठोकत आपल्या फायद्यासाठी जर का अध्यक्षच निघून जात असतील तर या समाजवादी पक्षाचे भविष्य अंधारात आहे एवढे मात्र नक्की.