रशियाशी संबंधांचे रहस्य, मुंबईस्थित कंपनीकडून Nvidia AI चिप्स वितरण; पाश्चात्य देशांच्या चिंतेत वाढ!

    28-Oct-2024
Total Views |
pharma-company-is-helping-putin-in-delivering-nvidia-ai-chips
 

मुंबई :        शहराच्या अंधेरी परिसरात स्थित असलेली श्रेया लाइफ सायन्सेस कंपनी आता थेट रशियाला तंत्रज्ञान विकून चर्चेत आली आहे. सामान्य औषध कंपनी असलेली श्रेया लाइफ सायन्सेसने रशियाला प्रगत तंत्रज्ञान पाठवताना दिसून आली. दुसरीकडे, पाश्चात्य देश रशियाच्या दुहेरी-वापर तंत्रज्ञानाचा प्रवेश रोखण्याचा प्रयत्न करत असताना कंपनीच्या निर्णयाने यूएस आणि युरोपियन युनियन(ईयू)च्या चिंता वाढल्या आहेत.




दरम्यान, श्रेया लाइफ सायन्सेसने एप्रिल ते ऑगस्ट २०२४ दरम्यान रशियाला १,१११ डेल टेक्नॉलॉजीज सर्व्हर निर्यात केले आहेत. सर्व्हर 'PowerEdge XE9680' असे संबोधले जाते. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी डिझाइन केलेले असून Nvidia किंवा AMD द्वारे उत्पादित उच्च-एंड प्रोसेसर आहेत. रशियाला प्रगत तंत्रज्ञान पाठविल्याचा डेटाच्या माध्यमातून समोर आले आहे. विशेषतः सर्व्हर आणि चिप्सवर रशियन लष्करी कंपन्यांना प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी यूएस, ईयूने बंदी घातली आहे.


श्रेया लाइफ सायन्सेसने सप्टेंबर २०२२ पासून आतापर्यंत रशियाला हे तंत्रज्ञान कायदेशीररित्या विकले आहे. या तंत्रज्ञानाचे एकूण मूल्य अंदाजे ३०० दशलक्ष डॉलर इतके असून दोन प्रमुख रशियन कंपन्यांनी तंत्रज्ञान विकसित केले आहे. मेन चेन लिमिटेड आणि I.S LLC ने तंत्रज्ञान विकत घेतले आहे. एकंदरीत, मुंबईची ही फार्मा कंपनी पुतिन यांना Nvidia AI चिप्स वितरीत करण्यात मदत करत असल्याने आता पाश्चात्य देशांची चिंता वाढली आहे.