काय आहे वसुबारस सणाचे महत्व?

    28-Oct-2024
Total Views |


वसुबारस 

 मुंबई : दिवाळी हा आपल्या संस्कृतीतील सगळ्यात महत्वाच्या सणांपैकी एक सण. वसुबारस या दिवसाने या सणाची सुरुवात होते. वसु म्हणजे गाय. या दिवशी गाईची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. हिंदू धर्मात गाईला खूप महत्व आहे. तिला आपण मातेचा दर्जा दिलेला आहे. तीची इतर दिवशीही आपण पूजा करतोच पण वसुबारसच्या दिवशी तिला अधिक महत्व असते. हिंदू पंचांगानुसार वसुबारस हा सण अश्विन पक्षातील द्वादशी तिथीला साजरी केला जातो. पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून ज्यावेळी १४ रत्न बाहेर पडली, त्यातून कामधेनूचीही उत्पत्ती झाली त्यामुळेच गाईला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. वसुबारसच्या दिवशी गाईची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते, त्यांना ओवाळले जाते आणि त्यांना गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. ग्रामीण भागात वसुबारस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पण शहरी भागात गाई घरोघरी पाळल्या जात नसल्यामुळे त्यांच्या प्रतिमांची पूजा केली जाते. ‘आम्हाला आशीर्वाद दे, आमचं कल्याण कर, आमच्या घरी सुखशांती नांदू दे’ अशी प्रार्थना या दिवशी गोमातेला केली जाते.