बांगलादेशातील हिंदू कॅन्टिनमध्ये कट्टरपंथी युवकाकडून गोमांसची मागणी

    28-Oct-2024
Total Views |

Beef
 
ढाका : बांगलादेशात ढाका विद्यापीठात हिंदू कॅन्टिनमध्ये एका कट्टरपंथी विद्यार्थ्याने गोमांस (Beef) खाण्याची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शेख हसीनांचे सरकार गेल्यानंतर बांगलादेशात मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. मात्र यामुळे बांगलादेशी हिंदूंना मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचाराचा सामना करावा लागत आहे. 
 
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो ढाका विद्यापीठातील एका हिंदू कॅन्टीनचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये कट्टरपंथी विद्यार्थ्याने जेवणासाठी गोमांसाची मागणी केली. यावेळी त्या कट्टरपंथी तरुणाने प्रक्षोभक घोषणा देत उन्माद केला आहे. एवढंच नाहीतर कट्टरपंथी तरुणाने गाय आणत तिचे मांस काढून खाऊ घाल असा दबाव टाकण्यात आला होता.
 
 
 
हिंदू धर्मात गोमातेला अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र कट्टरपंथींनी गोमांस खाऊ घालण्याचा हिंदू हॉटेल मालकावर दबाव आणला होता. यामुळे बांगलादेशातील हिंदूंच्या संकटांत वाढ होत आहे.
 
दरम्यान हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडिओची पुष्टी करण्यात आली नाही. या व्हिडिओचे फुटेज खरे असल्यास धार्मिक असहिष्णुता कॅम्पसमधील संभाव्य हिंसाचाराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.