"अब भौकाल और बडा होगा!"; 'मिर्झापूर' चित्रपटाची केली घोषणा

    28-Oct-2024
Total Views |
 
mirzapur
 
 
मुंबई : वेब सीरीज विश्वातील लोकप्रिय सीरीज म्हणजे मिर्झापूर. या सीरीजचे तीन यशस्वी भाग आल्यानंतर आता थेट मिर्झापूर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. पंकज त्रिपाठी, द्विवेंदू शर्मा, अली फजल यांची भूमिका असलेली 'मिर्झापूर' वेबसीरिज चांगलीच गाजली. आणि आता 'मिर्झापूर' वेबसीरिज चित्रपट रुपात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
 
'मिर्झापूर' वेबसीरिजचा पहिला सीझन करोना काळात आला होता 'मिर्झापूर'मधील कथानक आणि रक्तरंजित थरार प्रेक्षकांना विशेष आवडला. आता याच 'मिर्झापूर' वेबसीरिजचा चित्रपट येणार आहे. 'मिर्झापूर' चा चित्रपट येणार अशी घोषणा करत"अब भौकाल और भी बडा होगा" असं म्हटलं आहे. २०२६ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीच चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तर गुरमीत सिंग या दिग्दर्शन करणार आहेत. त्यामुळे 'मिर्झापूर' चित्रपटात आता कोणतं वेगळं कथानक पाहायला मिळणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
 

mirzapur