काटोलमधून अनिल देशमुखांची माघार! पुत्र सलील देशमुखांना तिकीट

28 Oct 2024 17:48:04
 
Anil Deshmukh
 
नागपूर : शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवडणूकीतून माघार घेतली आहे. सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी शरद पवार गटाची ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली. यात काटोल विधानसभा मतदारसंघातून अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांना तिकीट देण्यात आले आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पहिल्याच यादीत काटोल विधानसभेतून अनिल देशमुखांचे नाव जाहीर करण्यात आले होते. परंतू, आता चौथ्या यादीत या मतदारसंघातील उमेदवार बदलण्यात आला आहे. त्यांच्याऐवजी सलील देशमुख यांना संधी देण्यात आली आहे.
 
हे वाचलंत का? -  दहिसरमध्ये मनिषा चौधरींनी दाखल केला उमेदवारी अर्ज!
 
शरद पवार गटाची चौथी यादी पुढीलप्रमाणे :
 
१) माण - प्रभाकर घार्गे
२) काटोल - सलील अनिल देशमुख
३) खानापूर - वैभव सदाशिव पाटील
४) वाई - अरुणादेवी पिसाळ
५) दौंड - रमेश थोरात
६) पुसद - शरद मेंद
७) सिंदखेडा - संदीप बेडसे
 
 
 
Powered By Sangraha 9.0