इस्रायलचा खळखट्याक! थेट इराणच्या मुळावर घातला घाव

    28-Oct-2024
Total Views |

is ir w
 
 
तेहरान : (Iran–Israel proxy conflict) इस्रायल आणि हमासच्या युद्धाला वर्षपूर्ती अजूनही पूर्णविराम मिळण्याची कुठेलीही चिन्हं दृष्टीक्षेपात नाही. इराण, हमास, हिजबुल्लाह, यांच्या त्रयीने इस्रायलविरोधात उघडली आणि स्व:ताचेच नुकसान करून घेतले आहे. मागच्या आठवड्यात इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या सुरक्षा व्यवसथेचा भाग असणाऱ्या मिसाईल सिस्टमचे तीन तेरा वाजवले इराणला आता रोज्याच रोज स्व:ताच्या दुष्कृत्यांची फळं भोगावी लागत आहेत. याच हल्ल्याविषयी जाणून घेऊया १० ताज्या अपडेट्स

१. इराणने इस्रायलच्या हल्ल्याचा जागतिक पातळीवर निषेध केला आहे.

२. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा निषेध करत, संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरची आठवण करून दिली आहे.

३. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी या हल्ल्यानंतर, प्रतिशोधाचा विचार केल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. परंतु मध्यपूर्वेतील हे संकट लवकरात लवकर निवळावे अशीच इच्छा आहे.

४. इराणच्या विनंती वर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने सोमवारी तातडीची बैठक बोलावली आहे. रशिया, चीन, अल्जेरीया, या देशांनी या बैठकला संमती दर्शवली आहे.

५. इराण विरुद्ध इस्रायलने या आठवड्यात, केलेल्या हवाई हल्ल्यात हवाई संरक्षण यंत्रणांनी तेल आणि वायूसाठ्यासाठी राखीव असलेल्या संरक्षण प्रणालीला लक्ष्य केले.

६. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने ड्रोन स्ट्राईक्स करत वायु सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य केले. त्याच बरोबर, तेहरानच्या आण्विक कार्यक्रम आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र उत्पादन करणाऱ्या जागांना सुद्धा इस्रायलने लक्ष्य केले.

७. इस्रायल आणि हमास मध्ये सुरू असलेले हे युद्ध शांत होण्यासाठी आता इजिप्त सुद्धा प्रयत्न करणार असून २ दिवसांसाठी युद्धविराम व्हावा यासाठी ते प्रयत्नशील आहे. या दरम्यान, ओलीस ठेवलेल्या ४ इस्रायली नागरिकांना सोडण्याची योजना आखली गेली आहे. अद्याप यावर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रीया आलेली नाही.

८. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, जो पर्यंत हमासचा समूळ नाश आम्ही करत नाही तो पर्यंत आम्ही शांत बसणार नाही. नेतान्याहू यांच्या घरावर काही आठवड्यांपूर्वी हल्ला करण्यात आला होता. सुदैवाने यात कुठलीही जीवीतहानी झालेली नाही. 

९. पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकतंच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. 

१०. इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार इराणवरील झालेल्या हवाई हल्ल्याचा उद्देश दहशतलवाद्यांना संपवण्याचा होता.