निवडणुकीत कळवा - मुंब्र्याचा रावण आम्हीच दहन करू; आनंद परांजपे यांचा निर्धार
27-Oct-2024
Total Views |
ठाणे : ( Kalwa Mumbra Assembly Constituency ) कळवा - मुंब्रा विधानसभेमध्ये महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नजीब मुल्ला यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच शनिवारी दि. २६ ऑक्टोबर कळवा येथे महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला बाहेरगावी असल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. या निवडणुकीमध्ये नजीब मुल्लाच विजयी होतील आणि निवडणुकीत कळवा मुंब्र्याचा रावण आम्हीच दहन करू असा इशारावजा दावा राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला.
कळवा मुंब्रा विधानसभा निवडणुकीत विजय हा आमचाच असेल सोमवारी मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. यावेळी महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील. सोमवारच्या रॅलीत फक्त कळवा मुंब्रा विधानसभेतील नागरिक उपस्थित असतील इतर कोणत्याही भागातील नागरिक उपस्थित नसणार अशा खोचक टोला यावेळी नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांनी गोळा केलेल्या गर्दीवरून केला. एका मताने का होईना या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जिंकणार असल्याचा विश्वासही यावेळी नजीब मुल्ला यांनी व्यक्त केला.