कानिफनाथ मंदिराच्या ४० एकर जागेवर वक्फ बोर्डाचा दावा
27-Oct-2024
Total Views |
अहिल्यानगर : महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या कानिफनाथ मंदिराच्या ४० एकर जागेवरुन वक्फ बोर्ड आणि मंदिर संस्थानात वाद वाढत चालला आहे. वक्फ बोर्डाचा दावा आहे की जमीन एका दर्ग्याच्या मालकीची असून २००५ मध्ये वक्फ कायद्यांतर्गत नोंदणी करण्यात आली होती. ब्रिटीश काळापूर्वीच्या या जामिनीची मालकी सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे ऐतिहासिक कागदपत्रे असल्याचे कानिफनाथ मंदिर ट्रस्टचे म्हणणे आहे.
मंदिराचे विश्वस्त श्री हरी आंबेकर यांनी सांगितले की, ही जमीन पूर्वी शंकर भाई यांच्या पत्नी बिबन यांना सेवेसाठी दिली होती. यानंतर २००५ साली काही स्थानिक मुस्लिम रहिवाशांनी वक्फ कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर करुन ही जमीन वक्फच्या नावावर नोंदवली असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
कानिफनाथ मंदिर पाडून त्याचे दर्ग्यात रुपांतर करण्याचा प्रयत्न सुरू असता हा वाद आणखी चिघळला आहे. हे प्रकरण वक्फ न्यायाधिकरणाकडे पाठवण्यात आले. त्यांनी कानिफनाथ मंदिराच्या रचनेत कोणताही बदल न करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबत १९ मंदिर ट्रस्ट आणि ग्रामपंचायत सदस्यांना या ठिकाणी येण्यापासून रोखवण्यात आले.