मुंबई : समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमदने (Fahad Ahemed) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात पक्षप्रवेश केला. तो मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. या जागेवर अजित पवार गटाच्या सना मलिक यांच्या विरोधात लढणार आहेत.
शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील म्हणाले की, फहाद हा एक सुशिक्षित आणि अनुभवी युवा नेता आहे. ते म्हणाले की, फहादने याआधी समाजवादी पक्षात पक्ष प्रवेश केला. चर्चेनंतर फहादने शरद पवार गटात पक्षप्रवेश केला. त्यावेळी शरद पवार आणि पक्षाने त्यांना अणुशक्तीनगर मतदारसंघातून तिकीट दिले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणून अखिलेश यादव यांच्या नेतृत्त्वात अखिलेश यादव यांच्या नावावर सहमती दर्शवल्याबद्दल फहादने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे आभार मानले आहेत.
कोण आहेत फहाद अहमद?
फहाद हा ३२ वर्षांचा तरुण आहे. विद्यार्थी नेता म्हणून त्याने स्वतःचा ठसा उमटविला आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्याशी लग्न केल्यानंतर तो चर्चेत होता. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र युथ विंगचा अध्यक्ष आहे. नामांकित टाटा इन्स्टियूट ऑफ सोशल सायन्स अर्थात TISS मधून फहाद उच्चशिक्षित आहे. उत्तम संवाद आणि संघटन कौशल्य यांच्या फहादकडे असून संघर्ष, आंदोलन, चळवळ यामाध्यमातून त्याचे नेतृत्व पुढे आले आहे.
दरम्यान, शरद पवार गटाने महाराष्ट्र विधानसभा निवडणकीसाठी २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. ज्यात अनेक प्रमुख नावांचा समावेश आहे. पहिल्या यादीत ४५ उमेदवारांची नावे होती. दरम्यान ही निवडणूक येत्या २० नोव्हेंबर रोजी होणार आहे.