उमेदवार बदलण्याची काँग्रेसवर नामुश्की

27 Oct 2024 22:05:08

Congress
 
मुंबई :काँग्रेस पक्षाची विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर झाली. मात्र त्यानंतर आता त्या यादीतील दोन उमेदवार बदलण्याची काँग्रेसवर नामुश्की आली आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिम मतदारसंघात सचिन सावंत यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत धुसफुसीमुळे ही जागा अशोक चव्हाण यांना देण्यात आली आहे.
 
काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नव्हता. मात्र अंतिम वेळी जागावाटपाचा तिढा सुटला असला तरी अंतर्गत धुसफूस थांबायचं नाव घेत नाहीत. अशातच अंधेरी पश्चिम मतदारसंघाप्रमाणेच आता छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात मधुकर देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र आता त्यांची उमेदवारी रद्द करत लहु शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 

Andheri West Constituency 
 
काँग्रेसच्या यादीत फेरबदल :
 
१. राणा सानंदा - खामगाव
२. हेमंत चिमोटे - मेळघाट
३.मनोहर पोरेटी - गडचिरोली
४. दिग्रस - माणिकराव ठाकरे
५. नांदेड दक्षिण - मनोहर अंबाडे
६.देगलूर - निवृत्तीराव कांबळे
७. मुखेड - हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर
८.एजाज बेग - मालेगाव मध्य
९. शिरीष कुमार कोतवाल - चांदवड
१० . लहु शेवाळे यांना संधी (मधुकर देशमुख)
११. भिवंडी पश्चिम -दयानंद चोरघे
१२. अंधेरी पश्चिम - अशोक चव्हाण यांना संधी (सचिन सावंत)
१३. वांद्रे पश्चिम - असिफ झकारीया
१४. तुळजापूर - कुलदीप पाटील
१५. कोल्हापूर दक्षिण - राजेश लाटकर
१६. सांगली - पृथ्वीराज पाटील
 
 
Powered By Sangraha 9.0