आता बसच्या रांगेची धक्काबुक्की विसरा! उबर सुरू करतयं शटल सेवा!

    26-Oct-2024
Total Views |

UBER BUS
 
मुंबई : ( Uber Bus Shuttle Service ) कोलकाता आणि दिल्ली येथील यशानंतर उबर हैदराबाद आणि मुंबईमध्ये आपली बस शटल सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. ही सेवा शहरातील प्रवाश्यांसाठी परवडणारी व सर्वतोपरी सोयीस्कर ठरणार आहे. उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष प्रभजीत सिंग यांनी सेवा विस्तारित करण्याबाबत माहिती देताना मुंबई शहरांचा उल्लेख केला आहे.
 
मुंबई शहरातील खचाखच भरलेल्या लोकल ट्रेन आणि बेस्ट बसेसच्या तुलनेत मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी व सुसह्य व्हावा यासाठी या नवीन सेवेची निर्मिती करण्यात आली आहे.
 
तसेच कंपनीने जवळपास दशकभराच्या विश्रांतीनंतर मुंबईपासून सुरुवात करून भारतात आपली प्रीमियम उबर ब्लॅक सेवा पुन्हा सुरू केली आहे.
 
प्रवाश्यांना अधिक विश्वासार्ह आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देऊन शहराची सार्वजनिक वाहतूक सोईसुविधा सुधारणे हे उद्दिष्ट आहे असे प्रभजीत सिंग यांनी सांगितले.
 
भारताचे IT हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरू शहरामध्ये ही सेवा सुरू करण्याकरिता मान्यता मिळवण्यासाठी कंपनी भागधारकांशी चर्चा सुरू असल्याचा खुलासा सिंग यांनी केला.
 
सिंग म्हणाले, " यापूर्वी आम्ही भारतातील कोलकाता आणि दिल्ली या दोन शहरांमध्ये उबेर बस शटल सेवा सुरू केली आहे. आणि आता ही सेवा आणखी दोन शहरांमध्ये म्हणजेच हैदराबाद आणि मुंबईंमध्येही सुरू होणार आहे. परंतु दुर्दैवाने, बेंगळुरू शहराचा अद्याप यांमध्ये समावेश नाही." असेही त्यांनी सांगितले.