मुंबई : (Ameet Satam ) भाजप आमदार आणि अंधेरी (प) विधानसभेचे उमेदवार अमीत साटम यांचे शॉपर स्टॉप जवळील एस वी रोड येथे मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजप आणि शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार रवींद्र वायकर म्हणाले की, साटम यांनी मागील दहा वर्षात विविध विकास कामांच्या माध्यमातून अंधेरी (प) चा चेहरा मोहरा बदलला आहे. त्यामुळे येथील नागरिक त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करतील याची खात्री असल्याचे सांगितले.
आमदार अमीत साटम यांनी यावेळी बोलताना सांगितले की नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता मी मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचे नमूद केले. यावेळी त्यांनी ५८ उद्यानांचा विकास, १०० हून अधिक नवीन रस्ते, जुहू बीच सुशोभीकरण प्रकल्प, गिल्बर्ट हिल संवर्धन प्रकल्प, ४०० हून अधिक सीसीटीव्ही, २५ हून अधिक सामुदायिक केंद्रे आणि झोपडपट्ट्यांमध्ये १०० हून अधिक शौचालये आदी विकास कामे अंधेरी पश्चिम मध्ये केल्याचा उल्लेख केला.