आदिवासी तरुणांचे पोलिस बनण्याचे स्वप्न साकार होणार! गृहमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

    26-Oct-2024
Total Views |

Fadanvis


मुंबई :
राज्य सरकारने पोलिस भरतीत आदिवासी उमेदवारांना ५ से.मी. उंचीची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे आता आदिवासी तरुणांचे पोलिस बनण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
 
पोलिस भरतीमध्ये उंचीच्या अटीमुळे आदिवासी तरुणांना येणाऱ्या समस्यांबाबात काही दिवसांपूर्वी केळापूर-आर्णीचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन दिले होते. यात आदिवासी उमेदवारांना उंचीमध्ये पाच सेंटिमीटरची सूट देण्याबाबत मागणी करण्यात आली होती.
 
हे वाचलंत का? -  महायूतीने एकत्र येऊन अमित ठाकरेंना समर्थन द्यावं : आशिष शेलार
 
त्यानंतर शासनाने आदिवासी उमेदवारांना पाच सेंटिमीटरची सूट देण्याबाबत ४ ऑक्टोबर रोजी राजपत्र जारी केले आहे. या आदेशानुसार, युवकांची १६५ सेंटिमीटरऐवजी १६० सेंटिमीटर तर युवतींची १५० सेमीऐवजी १४५ सेमी एवढी उंची ग्राह्य धरण्यात येणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र पोलिस भरतीमध्ये आदिवासी तरुण-तरुणींना मोठा लाभ होणार आहे.