मुंबई : विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसने २३ जणांची दुसरी यादी जाहीर केली आहे. शुक्रवारी रात्री महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेत अर्ध्या तासाच्या आत दुसरी यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांनी शनिवारी सकाळी आपली यादी जाहीर केली. याआधी काँग्रेसने ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता त्यांनी २३ जणांची दुसरी यादी जाहीर केली आहे. तसेच लवकरच तिसरी यादी येणार असल्याचेही काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.