कट्टरपंथी संजू आणि त्याच्या मित्राने युवतीची गळा चिरून केली हत्या
25-Oct-2024
Total Views |
नवी दिल्ली : राजधानी दिल्ली येथील नांगलोई येथील खळबळजनक हत्याकांड घडल्याची घटना समोर आली आहे. कट्टरपंथी संजू आणि त्याच्या काही मित्रांनी १९ वर्षीय युवतीचा गळा चिरून तिची हत्या केली असून तिला जमिनीत गाडल्याचे हैवानी कृत्य केले.
यावेळी पीडितेला तिच्या कुटुंबीयांनी विचारले असता, ती भूताशी बोलत असल्याचे तिने सांगितले होते. पीडित मुलगी ही सध्या ७ महिन्यांची गरोदर असून ती लग्नासाठी आग्रही होती. तर दुसरीकडे संजूला हे मूल हवे होते आणि तो अद्यापही लग्नासाठी तयार होत असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.
पीडित युवती आणि युवक दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे, दरम्यान २१ ऑक्टोबर रोजी पीडित युवती घरातील काही महत्त्वाच्या वस्तू घेऊन संजूकडे गेली आहे. संजू त्याच्या दोन मित्रांसह तिला रोहतकला घेऊन गेला होता. त्यावेळी रोहतक येथे पीडितेची हत्या केली आणि मृतदेह गाडण्यात आल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली.
याप्रकरणात खूनी युवक हा कट्टरपंथी असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांना कोणतीही माहिती नव्हती. पोलिसांनी संजू आणि त्याच्या मित्राला अटक केली असून एक आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती देण्यात आली आहे.