मुंबई : यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी फार खास असणार आहे. कारण, भूल भूलैय्या आणि सिंघम या दोन्ही सुपरहिट चित्रपटांचे सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. भूल भूलैय्या ३ आणि सिंघम अगेन हे दोन्ही चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार असून नेमकी बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दरम्यान, 'भूल भूलैय्या ३'ची उत्सुकता शिगेला पोहोचली असून कार्तिक आर्यन पुन्हा एकदा रुह बाबाच्या भूमिकेतून भुतांना बाटलीत बंद करायला तयार झाला आहे.
यावेळी मात्र कार्तिक आर्यनचा सामना 'भूल भूलैय्या' युनिव्हर्समधील सगळ्यात खतरनाक नायिका मंजुलिकाशी होणार आहे. 'भूल भूलैय्या'च्या पहिल्या भागातील 'आमी जे तोमार' हे गाणं आजही सर्वांच्या मनात घर करुन आहे. 'भूल भूलैय्या ३'मध्ये हेच गाणं आता वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे माधुरी दीक्षित आणि विद्या बालन यांच्या डान्सची जुगलबंदी या गाण्यातून दिसणार आहे.
'
भूल भूलैय्या ३'च्या आमी जे तोमार गाण्याची पहिली झलक टी-सीरीजने शेअर केली आहे. या गाण्यात माधुरी दीक्षित आणि विद्या बालनच्या डान्सची आणि सुंदर अदाकारीची झलक पाहायला मिळते. हे संपूर्ण गाणं आज (२५ ऑक्टोबर) रोजी प्रदर्शित होणार आहे.
२००७ साली आलेल्या 'भूल भूलैय्या’ या चित्रपटाचा हा तिसरा भा आहे. पहिला भाग अक्षय कुमार याने गाजवला होता आणि त्यानंतर दुसऱ्या भागात कार्तिक आर्यनने धमाल आणली होती. आता तिसऱ्या भागात पुन्हा विद्या बालनने कमबॅक केल्यामुळे वेगळीच धमाल येणार यात शंका नाही, शिवाय, माधुरी पहिल्यांदाच हॉरर भूमिकेत पाहायला मिळणार आहे.