खळबळजनक! पुण्यात १३८ कोटींचे सोने पोलिसांनी केले जप्त

    25-Oct-2024
Total Views |

Pune
 
पुणे : सातारा महामार्गाच्या सहकारी नगर येथे पोलिसांनी तब्बल १३८ कोटींचे सोने पकडले आहे. ही घटना पुणे शहरानजीक घडल्याचे वृत्त आहे. हे सोने एमएच ०२ ईआर ८११२ या टेम्पोतून घेऊन जात होते. त्यावेळी पोलिसांनी नाकाबंदीवेळी हा टेम्पो पकडला असल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
 
आता याप्रकरणात पोलिस पुढील तपास करत असून १३८ कोटींचे सोने आले कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे. याप्रकरणात पुणे पोलीसांनी सांगितले की, आम्ही सध्या कागदपत्रे तपासत आहोत. सध्या आयकर विभाग आणि निवडणूक आयोग चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल.
 
पोलिसांनी जप्त केलेले सोने खाजगी कंपन्यांचे होते अशी माहिती समोर आली आहे. या सोन्याबाबत कागदपत्रे देण्यासाठी कंपनी तयार असल्याचे सांगितले. हे सोने घेऊन टेम्पो मुंबईहून पुण्यात आला होता. यावेळी निवडणुकीची धामधूम असताना नाकाबंदी करण्यात आली असता यावेळी संबंधित टोम्पोमध्ये सोने सापडले. हा टेम्पो एका खासगी लॉजिस्टिक कंपनीचा असल्याची माहिती समोर आली आहे.
 
याप्रकरणात पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सातारा रोड येथे त्यांची तपासणी सुरू झाली. याप्रकरणात पोलिसांना सोने जप्त केले असून टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे.