मनसेला मोठा धक्का! राज्य सरचिटणीस रणजित शिरोळेंचा राजीनामा

24 Oct 2024 17:53:03

RANJIT SHIROLE
 
मुंबई : ( MNS )सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या यादी जाहीर होताच नाराजीनाट्य, बंडखोरी अश्या गोष्टींना उधाण आले आहे. आणि याचा मोठा धक्का राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बसला आहे. मनसेचे राज्य सरचिटणीस रणजित शिरोळे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
 
त्यांनी आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी मनसे स्थापन झाल्यापासून मनसे सोबत काम करत आहे. ज्या जबाबदाऱ्या मला दिल्या, अनेक कामे दिली, निवडणुका लढवल्या. मी शिवाजीनगर मतदारसंघात काम करत आहे, मी नाराज नाही, कोणताही वाद नाही. मी निवडणूक लढवायची की नाही हे अजून ठरले नाही. मात्र निवडणूक फॉर्म आणला आहे, त्यामुळे लढूही शकतो, असे म्हणत त्यांनी पक्ष सोडत असल्याचे स्पष्ट केले.
 
तसेच भांडुपमध्ये मनसेचे नाराजीनाट्य पाहायला मिळाले असून शिरीष सावंत यांना उमेदवारी घोषित केल्याने विभाग अध्यक्ष संदीप जळगावकर यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0