रिलायन्स इंडस्ट्रीजचा नवा करार; मुकेश अंबानी म्हणाले, भारत 'AI' युगाचे....!

    24-Oct-2024
Total Views |
nvidia-and-reliance-will-create-ai-computing
 

मुंबई :     रिलायन्स इंडस्ट्रीज कृत्रिम बुध्दिमत्ता(एआय) क्षेत्रात पाऊल टाकत असून ग्लोबल चिप कंपनी एनव्हीडिया कॉर्पसोबत नवा करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून रिलायन्स एआय कम्प्युटिंग पायाभूत सुविधा व भारतात एक इनोव्हेशन सेंटर निर्माण केले जाणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे नवीन फ्लॅगशिप डेटा सेंटर एनव्हिडिया ब्लॅकवेल एआय(Nvidia Blackwell AI) चिप्स वापरण्याची शक्यता आहे.




दरम्यान, एनव्हिडिया ब्लॅकवेल एआयचे भारतात सहा ठिकाणी कार्यरत आहे. एआय पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी एक्सीलरेटेड कॉम्प्युटिंग स्टॅकची मदत होते. ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट(GPU), उच्च कार्यक्षमता नेटवर्किंग आणि एआय सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म, टूल्स समाविष्ट आहेत. सीईओ हुआंग आणि मुकेश अंबानी यांच्यात भारताच्या परिवर्तनीय क्षमता व क्षेत्रातील नेतृत्व भूमिकेवर चर्चा करण्यात आली.

देशात कोणत्या पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आहेत, याचा कोणताही अंदाज त्यांनी बांधला नाही. चीप डिझाइनिंगमध्ये भारत आधीच जागतिक दर्जाचा असून निव्हिडीया(Nvidia)चे डिझायनिंग बंगळुरू, हैदराबाद, पुणे येथे केले जाते. एनव्हिडीया कंपनी एक तृतीयांशहून अधिक कर्मचारी वर्ग भारतीय आहे. दरम्यान, निव्हिडीया आणि रिलायन्स या दोन्ही कंपन्यांमध्ये कराराद्वारे एआय संगणकीय पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.