सोने-चांदी दरात मोठी घसरण, ग्राहकांचा खरेदीकडे कल; जाणून घ्या आजचा भाव

24 Oct 2024 12:13:56
gold-silver-price-today


मुंबई : 
   ऐन दिवाळी सणाच्या मुहूर्तावर सोने-चांदी दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक घडामोडींमुळे कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचा ओढा अधिक दिसून येत असून सोने-चांदीच्या किंमती दिवसागणिक वाढत होताना दिसत आहेत. त्याचबरोबर, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. आज चांदी प्रतिकिलो १ लाख २ हजार रुपये इतका दराने विक्री करत आहे.
 
 


दरम्यान, सोन्याच्या दरात आज मोठी घसरण नोंदविण्यात आली असून मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ७९,४७० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ७२,८८० रुपये प्रति तोळावर आला आहे. तर दुसरीकडे, चांदीच्या भावात देखील नरमाई दिसून आली आहे. चांदीच्या दरात २ हजार रुपयांची घसरण झाली असून मुंबईत चांदीचे दर प्रति किलो १ लाख २ हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

विशेष म्हणजे दिवाळी सण जसजसा जवळ येतोय तशी ग्राहकांची गर्दी सराफा बाजारात पाहायला मिळत आहेत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांच्या सोने-चांदी खरेदी कल असतो त्यामुळे सराफा दुकानात एकच गर्दी दिसून येत आहे. मागील काही काळांत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीत मोठी वाढ झाली. एमसीएक्सवर सोन्याचा बेंचमार्क आज ३४४ रुपयांच्या वाढीसह ७८,१५६ रुपयांवर खुला झाला. यंदा सोन्याच्या फ्युचर्स किमतीने ७८,९१९ इतकी सर्वोच्च पातळी गाठली.




Powered By Sangraha 9.0