'घड्याळ' चिन्हाचा वाद : अजित पवार दाखल करणार हमीपत्र
24-Oct-2024
Total Views |
नवी दिल्ली : (Ajit Pawar - NCP) 'घड्याळ' या चिन्हाचा वापर न्यायालयीन अंतिम निर्णयाच्या अधीन आहे, असे जाहिरातीत जोडण्याच्या पूर्वीच्या आदेशाचे पालन करत असल्याचे हमीपत्र दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास (अजित पवार) गुरुवारी दिले आहेत.
न्यायमूर्ती सूर्यकांत, न्या. दीपंकर दत्ता आणि न्या. उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी गटाने दाखल केलेल्या याचिकेवर हा आदेश दिला आहे.
अजित पवार यांनी कोणतेही अस्वीकरण न करता घड्याळ चिन्हाचा वापर करून मतदारांच्या मनात ‘मोठ्या प्रमाणात संभ्रम’ निर्माण केल्याचा दावा शरद पवार गटाने आपल्या याचिकेत केला आहे.
न्यायालयाने सुनावणीवेळी दोन्ही पक्षांना कोणत्याही प्रकारचा पेच निर्माण होऊ नये म्हणून आधीच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
शरद पवार गटाने दाखल केलेल्या अंतरिम अर्जावर न्यायालयाने अजित पवार गटास आगामी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी घड्याळाऐवजी नवीन चिन्ह वाटप करण्याची मागणी केली आहे, यावरही नोटीस बजावली आहे.
न्ह वाटप करण्याची मागणी केली आहे, यावरही नोटीस बजावली आहे.