सातव्यांदा उमेदवारी, रेकॉर्ड पार विजयाची तयारी

आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून दाखल केला सातव्यांदा उमेदवारी अर्ज

    24-Oct-2024
Total Views |

Mangal Prabhat Lodha
 
मुंबई : सकाळी ११ वाजता मलबार हिल विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि या क्षेत्रासाठी भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मलबार हिलमधील नागरिक उपस्थित होते. मागील ३० वर्ष मलबार हिल विधानसभा मतदार संघातून मंगल प्रभात लोढा सातत्याने आमदार म्हणून निवडून येत आहेत. या निवडणुकीत सुद्धा आपण नक्की जिंकू! मलबार हिल विधानसभा मतदारसंघासाठी काम करण्याची संधी पुन्हा एकदा जनता देईल असा विश्वास त्यांनी यप्रसंगी व्यक्त केला आहे.
 
प्रसंगी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, " मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील जनता आमच्या सोबत आहे. नक्कीच इथून महायुतीचाच उमेदवार निवडून येईल. मी गेले १० दिवस येथील लोकांना भेटतो आहे आणि या वेळी नागरिकांचा उत्साह कौतुकास्पद आहे. यावेळची निवडणूक मी नाही तर स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी जनताच लढणार आहे. सर्वजण आज मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यावेळी मी सातव्यांदा उमेदवारी अर्ज भरत असून, संपूर्ण मलबार हिलमधील जनता यावेळी सुद्धा माझ्या साथीला आहे. इतके वर्ष मला सहकार्य केल्याबाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. फक्त मलबार हिलमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा एकदा येईल!"
 
मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आणि राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून देखील मागील २ वर्षांच्या काळात काम केले आहे.