शमिला : हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात, कट्टरपंथींना बाल उद्यानाच्या जागेवर बेकायदेशीरपणे मकबरा बांधल्याचा आरोप आहे. स्थानिक हिंदू संघटनांनी समाधीस्थळ लवकरच रिकामे करण्याचा अल्टिमेटम जारी करण्यात आला आहे. या जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्यासाठी समाधी बांधण्यात आल्याचा गंभीर आरोप हिंदू संघटनांनी केला आहे.
देवभूमी संघर्ष समितीने म्हटले की, कट्टरपंथींनी १९९५ साली संबंधित समाधीच्या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान तयार करण्याबाबत करार करण्यात आल्याचे सांगितले होते. आता त्या बदल्यात त्यांनी दुसऱ्या ठिकाणी जमीन घेतली होती. मात्र देवभूमी संघर्ष समितीचे म्हणणे आहे की, त्यानंतरही या जमिनीचा ताबा कायम राहावा या उद्देशाने संबंधित जागेवर समाधी बांधण्यात आली आहे. यासाठी आंदोलन करण्याचे आव्हान समितीने दिले आहे.
याआधी हिमाचल येथील शिमला आणि मंडी येथील बेकायदेशीर मशिदी पाडण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. तसेच शिमला येथे मशीद पाडण्याचे काम सुरू झाले असून मंडी मशिदीचे पाणी आणि वीज खंडित करण्यात आली आहे.