होऊ दे शंखनाद! उपमुख्यमंत्री फडणवीस उद्या अर्ज दाखल करणार; भव्य नामांकन रॅलीचे आयोजन

    24-Oct-2024
Total Views |
 
Fadanvis
 
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार दि. २५ ऑक्टोबर रोजी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने भव्य नामांकन रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यात सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
हे वाचलंत का? -  अहेरीत यंदा बाप विरुद्ध लेक सामना रंगणार!
 
नागपूर येथील संविधान चौक ते आकाशवाणी चौक अशी ही भव्य रॅली असेल. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे. भाजपा-महायूती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे, असे म्हणत या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.