आमिर खानच्या 'दंगल'ने २००० कोटी कमावले, आम्हाला फक्त...; बबिता फोगाटचा मोठा खुलासा

24 Oct 2024 13:16:46

dangal  
 
 
मुंबई : अभिनेता-निर्माता आमिर खान याच्या दंगल या चित्रपटाने प्रेक्षकांना भरघोस प्रतिसाद मिळवत बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातही या चित्रपटाने नाव कमावले असून जगभरातील एकूण कमाई २००० कोटी इतकी झाली आहे. दंगल या चित्रपटामुळे फोगाट कुटुंबाला प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात महावीर फोगाट आणि त्यांच्या मुली गीता, बबिता यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. मात्र, आता या चित्रपटाबाबत बबिता फोगाटने मोठा खुलासा केला आहे. दंगल चित्रपटाने २००० कोटी कमावले पण फोगाट कुटुंबाला फक्त १ कोटी रुपये दिले असं बबिता फोगाट म्हणाली आहे.
 
भारताची माजी कुस्तीपटू बबिता फोगाट हिने कुस्तीतून निवृत्ती घेत राजकारणात प्रवेश केला. दरम्यान, आता बबिताने दंगल चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला आहे. बबिता म्हणाली की, दंगल चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २००० कोटींहून अधिक कमाई केली होती. पण, फोगाट कुटुंबाला निर्मात्यांकडून फक्त १ कोटी रुपये मोबदला म्हणून दिला.
 
दंगल चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात ३८७.३९ कोटींची कमाई केली होती. या व्यतिरक्त जगभरात या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. भारताच्या कुस्तीपटू गीता फोगाट आणि बबिता फोगाट यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे कथानक होते.
Powered By Sangraha 9.0