मुंबई : भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये सात टक्क्यांच्या वाढीचा अंदाज आयएमएफने वर्तविला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला पीक अनुकूलतेमुळे चालना मिळण्याची शक्यता असून आर्थिक वृध्दी दर वाढेल, असे आयएमएफ(एशिया पॅसिफिक विभागा)चे संचालक कृष्णा श्रीनिवासन यांनी एका मुलाखतीत सांगितले.
दरम्यान, भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून देशाची आर्थिक मूलभूत तत्त्वे चांगली आहेत. अन्नधान्याच्या किमती सामान्य झाल्यामुळे काही चढ-उतार झाले असले तरी, २०२४-२५ या आर्थिक वर्षात महागाई ४.४ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. भारतात निवडणूक असूनही वित्तीय एकत्रीकरण मार्गावर असून रिझर्व्हची स्थिती बऱ्यापैकी आहे. मॅक्रो अर्थव्यवस्थेकरिता मूलभूत तत्त्वे सामान्यत: चांगली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, निवडणुकांनंतर देशाच्या सुधारणांचे प्राधान्य तीन क्षेत्रांमध्ये असावे. काही चढउतार असूनही अन्नधान्याच्या किमती सामान्य झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षात महागाई ४.४ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. भारतीय अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढत असून भारतात रोजगार निर्मितीबाबत अनेक प्रश्न आहेत. २०१९-२० मध्ये स्वीकारलेल्या श्रम संहिता लागू करणे महत्वाचे आहे कारण ते कामगारांना सामाजिक संरक्षण प्रदान करताना कामगार बाजारपेठ मजबूत करण्याची संधी प्रदान करतील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.