वारी एनर्जीज आयपीओ दुसऱ्याच दिवशी आठ पटीने ओव्हरसबस्क्राईब; मजबूत लिस्टिंग जीएमपीचे संकेत
23-Oct-2024
Total Views |
मुंबई : वारी एनर्जीज लिमिटेडचा आयपीओ बाजारात खुला झाला असून आज शेवटची तारीख गुंतवणूकदारांना असणार आहे. वारी एनर्जीजचा आयपीओ दि. २१ ते २३ ऑक्टोबरपर्यंत सबस्क्रिपशनसाठी खुला आहे. या आयपीओ सबस्क्रिपशनच्या दुसऱ्याच दिवशी जोरदार मागणी दिसून आली असून ८ पटीने अधिक ओव्हरसबस्क्राईब झाला आहे.
दरम्यान, आज सबस्क्रिप्शनची अंतिम तारीख असून पैसे गुंतवण्याची शेवटची संधी गुंतवणूकदारांना मिळणार आहे. ग्रे मार्केट प्रीमियम(जीएमपी)च्या माध्यमातून कंपनीची लिस्टिंग मजबूत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून आधीच १,२७६.९३ कोटी रुपये उभारले आहेत. देशातील सर्वात मोठ्या सौर मॉड्यूल निर्मिती कंपनी वारी एनर्जीज लिमिटेड आयपीओला मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
'वारी एनर्जीज लिमिटेड'चा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर(आयपीओ) सबस्क्रिप्शनकरिता बाजारात दाखल झाला आहे. 'वारी एनर्जीज लिमिटेड'चा आयपीओ दि. २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान गुंतवणूकदारांसाठी खुला राहील. कंपनी आयपीओद्वारे ४,३२१ कोटी रुपये बाजार भांडवल उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेले ४,८००,००० इक्विटी समभाग विक्रीची ऑफर यामार्फत करण्यात आली आहे.