मुंबई : मराठीसह हिंदी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव याला त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता रितेश देशमुख याने खास भेट दिली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील रणवीर सिंग अशी ओळख बनवलेला सिद्धार्थ जाधव मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आला. 'अगं बाई अरेच्चा' या केदार शिंदेंच्या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलेल्या सिद्धार्थने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये कामं केली. आहे. आज त्याच्या वाढदिवशी अभिनेता रितेश देशमुखने खास पोस्ट शेअर केली आहे.
रितेशने सिद्धार्थच्या वाढदिवशी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. माऊली चित्रपटाच्या शूटिंग सेटवरील सिद्धार्थबरोबरचे काही फोटो रितेशने शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत रितेशने सिद्धार्थला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. "हॅपी बर्थडे माय फेव्हरेट सिद्धार्थ...आय लव्ह यू" असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. रितेश आणि सिद्धार्थने माऊली चित्रपटा एकत्र काम केलं होतं.
आजवर, 'जत्रा', 'साडे माडे तीन', 'ये रे येरे पैसा', 'माझा नवरा तुझी बायको', 'दे धक्का', 'फक्त लढ म्हणा','खो खो', 'हुप्पा हुय्या', 'धुरळा' या मराठी तर 'सिंबा', 'सूर्यवंशी', 'सर्कस' या हिंदी चित्रपटांमध्ये तो झळकला आहे.