पुण्यात अवैध वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोऱ्यांना अटक

23 Oct 2024 19:02:34

illegal residence Arrested
 
पुणे : राज्यातील पुणे येथील रांजणगाव येथे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या २१ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी त्रिपुरा पोलिसांनी ३ रोहिंग्या, मुस्लिम आणि २ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. याप्रकरणात आता पुणे पोलिसांनी १० अवैध घुसखोरांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ ऑक्टोबर रोजी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यासोबत त्यांच्याकडे बनावट अधारकार्ड असल्याची माहिती याप्रकऱणातून उघडकीस आली आहे.
 
याप्रकरणी आता पुणे ग्रामीण पोलीसांनी सांगितले की, हे सर्व लोक सहा महिने ते १० वर्षांपासून भारतात आले होते. त्यांनी प.बंगाल आणि बांगलादेशातील पायी सीमा ओलांडली. तसेच नौका घेऊन बेकायदेशीरपणे सागरी मार्गाने पोहोचले, असे सांगण्यात आले.
 
ते भारतात आले कसे याबाबत त्यांनी जबाब नोंदवण्यात आला होता. ते म्हणाले की, सर्व बेकायदेशीर स्थलांतरित होऊन बांधकाम सुरू असलेल्या साइटवर किंवा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. एमआयडीसीतील एका कंपनीने त्यांना कामावर घेतले नव्हते.काहींना तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुले आहेत.
 
दरम्यान जेव्हा त्यांनी भारतात घुसखोरी केली होती तेव्हा ते गुजरात आणि मुंबईत राहत होते. काही महिन्यांआधी त्यांनी पुणे शहरात स्थलांतरण केले होते, अशी माहिती त्यांनी दिली असल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांनी सांगितले. याप्रकरणाची माहिती मिळताच निरीक्षक अविनाश शिलीमकर, महादेव वाघमोडे, सहायक नरीक्षक प्रकाश पवार यांच्या पथकाने संपूर्ण परिसराची तपासणी केली असता ते लहान भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होते. अतिरिक्त पोलीस अधिक्षक रमेश चोपडे म्हणाले की, आम्ही त्यांच्या जमीनमालकांना, घरलमालकांना समन्स जारी करु आणि अवैध स्थलांतरितांना भाडेतत्त्वावर घरे कशी दिली गेली याची पडताळणी करु, असे पोलिसांनी तपास करून याप्रकरणाची माहिती घेतली.
 
 
Powered By Sangraha 9.0