सणासुदीच्या हंगामात भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल; स्टेट ऑफ द इकॉनॉमी अहवाल प्रसिध्द

23 Oct 2024 13:58:43
festive season will helps boost economy


मुंबई :   
 सणासुदीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्यक्त केला आहे. आरबीआयच्या स्टेट ऑफ द इकॉनॉमी अहवालात अर्थव्यवस्थेसंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. काही उच्च-वारंवारता निर्देशकांमध्ये मंदी असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. परंतु, सणासुदीच्या काळात उपभोगाच्या मागणीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे आरबीआयने म्हटले आहे.

 
दरम्यान, २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत भारतात तात्पुरती मंदी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एकूणातच सणासुदीच्या काळात मागणीने वेग घेतला असून ग्राहकांचा आत्मविश्वास सुधारत क्रयशक्ती वाढली आहे,” असे या अहवालात म्हटले आहे. भू-राजकीय तणाव असूनही भारताच्या आर्थिक वाढीच्या दृष्टीकोनाला देशांतर्गत उद्योग-व्यवसायांचा पाठिंबा दिसून येत आहे, असेही अहवालात स्पष्ट झाले आहे.

काही उच्च-वारंवारता निर्देशकांनी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आर्थिक वाढ संथ गतीने सुरू असल्याचे दर्शविले आहे. या सर्व गोष्टींमागे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये असामान्यपणे अतिवृष्टी यांसारख्या विशिष्ट घटकांमुळे हा परिणाम दिसला आहे. त्याचबरोबर, सुधारित कृषी दृष्टिकोनातून ग्रामीण मागणीला चालना मिळणे अपेक्षित होते. वस्तू आणि सेवा कर संकलन, वाहन विक्री, बँक पत वाढ, व्यापारी मालाची निर्यात आणि उत्पादन खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (पीएमआय) यातील संथपणा या अहवालात नमूद करण्यात आला आहे.







Powered By Sangraha 9.0