महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड – लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

    23-Oct-2024
Total Views |

महाराष्ट्र सेवा संघ  
 
मुलुंड : महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंडच्या – सा. स. न. चिं. केळकर ग्रंथालय आणि मैत्रेयी विभागातर्फे आयोजित केलेल्या “मला काय वाटतं....” – वर्ष पाचवे - लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. प्रथम पारितोषिक सुनील कुलकर्णी (बेरोजगारीचे काय करायचे?), द्वितीय पारितोषिक गार्गी वैशंपायन (आधुनिक भारताच्या जडणघडणीत समाजमाध्यमांचे योगदान), तृतीय पारितोषिक अनिल कदम (लग्नसंस्थेचे भवितव्य), चौथे पारितोषिक मनोज मेहता (माझी सोलो ट्रीप), पाचवे पारितोषिक सुचेता आचार्य (लग्नसंस्थेचे भवितव्य) आणि उत्तेजनार्थ पारितोषिक सागर साबडे (द. मा. मिरासदारांचा विनोद), अलका जोशी (लग्नसंस्थेचे भवितव्य), हर्षद आचार्य (तंत्रज्ञान / कृत्रिम बुद्धिमत्तेने भ्रष्टाचारावर उपाय सापडेल का?) यांना जाहीर झाले आहे. या स्पर्धेचा पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार, दि. २६ ऑक्टोबर २०२४ रोजी, सायंकाळी ५.३० वाजता, संस्थेच्या सु. ल. गद्रे सभागृहात होणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून तसेच देशातून आणि परदेशातूनही एकूण ९४ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग भाग घेतला होता. या स्पर्धेच्या परीक्षक आणि पुरस्कार सोहळ्याच्या प्रमुख अतिथी पत्रकार, लेखिका श्रीमती माधुरी ताम्हाणे आणि पॉप्युलर प्रकाशनाच्या प्रमुख प्रकाशक श्रीमती अस्मिता मोहिते आहेत.