पाच वर्षांनंतर पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांची द्विपक्षीय बैठक
23-Oct-2024
Total Views |
कझान : रशियातील कझान शहरात आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित केले. त्यावेळी रशियातील ब्रिक्स व्यासपीठावरून मोदींनी दहशतवादी आणि रशिया-युक्रेन युद्धावर भाष्य केले आहे. दहशतवादाबाबत कसलाही दुटप्पी मापनदंड मापता येऊ नये, असे मोदींनी ब्रिक्सच्या फोरम परिषदेत संबोधित केले आहे. त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत पाच वर्षानंतर बुधवारी द्विपक्षीय चर्चेत भाग घेतला आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, दहशतवादी सामना करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य केले पाहिजे. देशातील तरुणांमध्ये कट्टरतावाद रोखण्यासाठी आपण सक्रिय पाऊल टाकणे गरजेचे असल्याचे मोदी म्हणाले आहेत. आपण युद्ध नाहीतर शांततेला पाठिंबा देतो ज्यात एकत्रितपणे कोरोनासारख्या आव्हानाचा पराभव केला, असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
#WATCH | 16th BRICS Summit in Kazan, Russia | Prime Minister Narendra Modi says "I want to thank President Putin for the successful organisation of the 16th BRICS Summit. I once again heartily welcome the new colleagues associated with BRICS. In its new form, BRICS represents 40%… pic.twitter.com/ixaZtQWGIe
ब्रिक्स दरम्यानच्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जग, युद्ध, संघर्ष, आर्थिक, अनिश्चितता, हवामान बदल, दहशतवादासारख्या अनेक आव्हानांवर भाष्य केले. सायबर सुरक्षा, डीपफेकसारखे संकट, लोकहिताचे मुद्दे, जनहिताच्या गोष्टींवर भाष्य करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली.