मुंबई : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित ‘कै. आबा पडते राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी आज २३ ऑक्टोबर रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात पार पडणार आहे. या फेरीसाठी प्रगती सेवाभावी संस्था, बीडची ‘नवस’, सिडनहॅम महाविद्यालयाची ‘अविघ्नेया’, कलांश थिएटरची ‘क्रॅक्स इन द मिरर’, महर्षी दयानंद स्वायत्त महाविद्यालयाची ‘ब्रह्मपुरा’ आणि मुक्ताई फाऊंडेशन, पुण्याची ‘मुन विदाऊट स्काय’ या एकांकिकांची निवड झाली आहे. ही अंतिम फेरी पाहण्यासाठी प्रवेश शुल्क १०० रुपये आहे.