भाजपचे २४ उमेदवार 'या' दिवशी अर्ज दाखल करणार

23 Oct 2024 19:10:46

bjp
 
मुंबई : ( BJP )आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी रविवार, दि. २० ऑक्टोबर रोजी जाहीर केली. त्यातील २४ उमेदवार गुरुवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
 
मुंबईच्या वडाळा नायगाव मतदारसंघातून सलग ८ वेळा विजय मिळवणारे कालिदास कोळंबकर गुरुवारी अर्ज दाखल करतील. त्यांना यंदा विजय मिळाल्यास, तो विश्वविक्रम ठरेल. कारण, सलग नऊवेळा निवडून येण्याची किमया आजवर कोणालाही साधता आलेली नाही. त्यामुळे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झळकण्याची संधी त्यांच्याकडे आहे. त्याशिवाय कांदिवली पूर्व मतदारसंघाचे विद्यमान आमदार अतुल भातखळकर, योगेश सागर (चारकोप), मिहिर कोटेचा (मुलुंड), अमित साटम (अंधेरी पश्चिम) आणि पराग आळवणी (विलेपार्ले) हेही गुरुवारी नामांकन पत्र दाखल करतील.
 
 
 
Powered By Sangraha 9.0