भारताच्या जीडीपी वृध्दीचा दर ७ ते ७.२ टक्के राहील; 'डिलॉईट इंडिया'चा अंदाज

22 Oct 2024 15:46:08
deloitte-estimates-indian-economy-to-grow


मुंबई :    चालू आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादना(जीडीपी)त वाढीचा अंदाज डेलॉइट इंडियाने वर्तविला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५मध्ये सरकारी खर्च आणि उच्च उत्पादन गुंतवणुकीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत ७.० ते ७.२ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज डेलॉइटने व्यक्त केला आहे. जागतिक बाजारातील मंदीचा संभाव्य परिणाम आगामी आर्थिक वर्षावर होण्याची शक्यता आहे, असेही डेलॉइट इंडियाने म्हटले आहे.
दरम्यान, डिलॉईट इंडियाने 'इंडियन इकॉनॉमी आउटलुक टू ऑक्टोबर २०२४' मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृध्दीसंदर्भात भाष्य केले आहे. वेगाने विस्तारणारे उत्पादन क्षेत्र, तेलाच्या स्थिर किंमती आणि निवडणुकीनंतरची संभाव्य आर्थिक सुलभता भारतातील भांडवलाचा ओघ वाढवू शकते, उत्पादन खर्च कमी करू शकतो. दीर्घकालीन गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढू शकतात. त्याचप्रमाणे, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत वार्षिक आधारावर अर्थव्यवस्थेने ६.७ टक्क्यांनी वाढ नोंदविली आहे.

मागील पाच तिमाहीतील ही सर्वात कमी वाढ असली तरी, जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचे स्थान टिकून आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये जीडीपी वाढीचा अंदाज ७ टक्के ते ७.२ टक्के आणि आगामी आर्थिक वर्षाकरिता ६.५ ते ६.८ टक्क्यांच्या दरम्यान असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय)ने ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच बाजारातील व्यवहारांवरून चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था वाढीचा दर ७.२ टक्के असेल.


Powered By Sangraha 9.0