मुंबई : महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून सुरु असलेल्या वादामुळे आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी बाळासाहेब थोरातांवर समन्वयाची जबाबादारी सोपवली आहे. नाना पटोले आणि संजय राऊतांमध्ये वारंवार खटके उडत असल्याने पटोलेंना बाजूला सारत थोरात यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
हे वाचलंत का? - ...म्हणून ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिले! लाडकी बहिण योजनेबाबात मुख्यमंत्री शिंदेंचं विधान
दरम्यान, बाळासाहेब थोरात हे मुंबईत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी ३ वाजता महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात बैठक होणार आहे. मात्र, नाना पटोले या बैठकीत सहभागी नसतील, असे सांगण्यात येतआहे.