दिल्लीत शाळेनजीक स्फोटाची घटना! 'या' संघटनेने घेतली स्फोटाची जबाबदारी

21 Oct 2024 12:23:40

delhi blast
 
 नवी दिल्ली:(Delhi Blast) नवी दिल्लीतील रोहिणी परिसारात, रविवारी सकाळी झालेल्या स्फोटामुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती. अशातच आता नवीन माहिती समोर आली आहे. या स्फोटाची जबाबदारी खालिस्तान जिंदाबाद फोर्सने घेतली आहे. टेलिग्राम वर या संदर्भातील पोस्ट व्हायरल करत संघटनेने ही माहिती दिली. या स्फोटामध्ये कुठलीही जीवीतहानी झाली नसून, या संदर्भात सुरक्षा दल अधिकचा तपास करत आहेत.

खालिस्तानी कनेक्शन अखेर उघड
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खालिस्तानी संघटनेचा या हल्ल्यामागे असलेल्या संबंधांची सखोल चौकशी सुरु आहे. या संदर्भात, दिल्ली पोलिसांच्या तपास पथकाने 'जस्टिस लीग इंडिया' नावाच्या टेलिग्राम चॅनलबद्दल तपशील मागवला आहे. अद्याप टेलिग्रामकडून प्रतिसाद मिळालेला नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. रविवारी संध्याकाळी काही टेलिग्राम चॅनलसवर या स्फोटाचा व्हिडीओ व्हायरल झाला, ज्याला खालिस्तानी झिंदाबादचे वॅटमार्क लावले होते, या सोबतच, एक संदेश जारी करण्यात आला ज्यात भारताने आपल्या कॅनडातील कारवाया वेळीच रोखल्या नाहीत तर परिणाम वाईट होतील अशी धमकी देण्यात आली आहे.

कॅनडा वादाचे दिल्लीत पडसाद?
भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधांमध्ये सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर देशाच्या अंतर्गत बाबींवर हस्तक्षेप करण्याचा आरोप केला आहे. भारताच्या दूतवासांना अपमानास्पाद वागणूक देण्याता आली. ट्रूडो यांनी केलेले दावे खोटे असल्याचे पुरावे खुद्द कॅनडामध्येच सादर झालेले असताना, तिथल्या खालिस्तानी गटांकडून मात्र, भारताचा अपप्रचार सुरुच आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफ शाळेजवळील झालेल्या स्फोटामध्ये आयईडी (इम्प्रोवाईस्ड एक्सपोलसीव डीव्हाईस) चा वापर करण्यात आला असून या स्फोटामुळे शाळेच्या भिंतीला तडे गेले आहे. अनेक वाहणांच्या काचा फुटल्या तसेच काही दुकांनांचे देखील नुकसान झाले.
 

Powered By Sangraha 9.0