अमन नाव सांगत मुलींच्या फॅशन शोमध्ये कट्टरपंथी साहिलचा बेकायदा प्रवेश

    20-Oct-2024
Total Views |

Love Jihad
 
इंदौर : मध्य प्रदेशची राजधानी इंदौर येथे एका फॅशन शोमध्ये मोठा गदारोळ झाल्याची घटना आहे. साहिल खान नावाच्या कट्टरपंथी युवकाने अमन नाव सांगून फॅशन शोमध्ये घुसला होता, त्यावेळी हिंदू धर्माच्या बजरंग दलाचे लोक ही तेथे होते, असे वृत्त आहे. प्रसारमाध्याच्या वृत्तानुसार, जेव्हा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाला त्यांचे ओळखपत्र विचारले असता, तेव्हा साहिल नाव असल्याचे वास्तव समोर आले आणि एकच गोंधळ सुरू झाला.
 
दरम्यान, फॅशन शोच्या आयोजिका दीपिका शर्मा यांनी याप्रकरणात लक्ष घातले आणि साहिलच्या कानशिलात लगावली. या फॅशन शोला कोणतेही गालबोट लागता कामा नये असे सांगितले. त्यावेळी सांगण्यात आले होते की, साहिल फॅशन शोमध्ये परवानगीशिवाय प्रवेश केला होता. नंतर त्या शोमध्ये आयोजकांनी एक व्हिडिओ जारी केला असता, त्यात माफी मागतिली, परंतु याप्रकरणात पोलिसांनी आरोपी साहिलविरोधात कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
 
इंदूर येथील स्कायलाईन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या फॅशन संबंधित असलेल्या कार्यक्रमात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, हिंदू मुलींना लव्ह जिहादचा बळी बनवले जात आहे. अशा अनेक घटना देशभरात घडत असून याचा नेमका हेतू काय आहे? असा सवाल करण्यात आला आहे.