रिअल इस्टेटमधील संस्थात्मक गुंतवणुकीत मोठी वाढ

    02-Oct-2024
Total Views |
real estate institutional investment hiked


मुंबई :   
 यंदा रिअल इस्टेट क्षेत्रातील संस्थात्मक गुंतवणूक वाढतच असून तिसऱ्या तिमाहीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ४५ टक्क्यांच्या वाढीसह रिअल इस्टेट क्षेत्रातील कार्यालय मागणीही विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. या तिमाहीत एकूण संस्थात्मक गुंतवणुकीपैकी निम्म्याहून अधिक गुंतवणूक कार्यालयासाठी होती.




दरम्यान, रिअल इस्टेट रिसर्च फर्म कॉलियर्स इंडियाच्या अहवालानुसार २०२४च्या तिसऱ्या तिमाहीत रिअल इस्टेटमध्ये संस्थात्मक गुंतवणूक १.१ अब्ज डॉलर होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत ७,९३४ लाख डॉलरपेक्षा ४५ टक्के जास्त आहे. एकूण संस्थात्मक गुंतवणुकीबद्दल जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ४.७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली. गेल्या वर्षीच्या गुंतवणुकीपेक्षा ३ टक्के अधिक दिसून आली आहे.

रिअल इस्टेट क्षेत्रात चेन्नई आणि मुंबईमध्ये ५७ टक्के संस्थात्मक गुंतवणूक करण्यात आली आहे. यासह एकूण संस्थात्मक गुंतवणुकीपैकी निम्म्याहून अधिक गुंतवणूक चेन्नई आणि मुंबईत झाली. तिसऱ्या तिमाहीत एकूण गुंतवणुकीत या दोन शहरांचा वाटा ५७ टक्के होता. तिसऱ्या तिमाहीत चेन्नईतील जवळपास निम्म्याहून संस्थात्मक गुंतवणूक परकीय गुंतवणुकीद्वारे चालविली गेली.