आता मुंबईतील डबेवाल्यांना मिळणार 'ई-मोटार'; 'लॉर्ड्स ऑटोमॅटिव्ह'चा पुढाकार!

लॉर्ड्स ऑटोमॅटिव्हकडून पर्यावरणस्नेही ई-वाहनांद्वारे डबेवाल्यांचे सक्षमीकरण

    02-Oct-2024
Total Views |
mumbai dabbawalas e motor vehicle lords automative


मुंबई :   
 लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेली लॉर्ड्स ऑटोमेटिव्हकडून मुंबई शहरातील डबेवाल्यांना लॉर्ड्स बिजली या ई-मोटारसायकली दिल्या आहेत. लॉर्ड्स ऑटोमेटिव्ह प्रा. लिमिटेडकडून शाश्वत गतिशीलतेच्या उद्देशातून मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर असोसिएशनकडून आयोजित कार्यक्रमात २५ डबेवाल्यांना ई-मोटार दिली आहे. या प्रकल्पाला विविध एनजीओ, इंडिया इन्फोलाइन फायनान्स लिमिटेड आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी सहभागी होत पाठबळ दिले.

दरम्यान, हवेतील कार्बन प्रदूषण आणखी कमी करण्याच्या उद्देशांना चालना देण्यासाठी अनेक पावले उचलण्यात येत आहेत. शहरातील डबेवाले दररोज २०,००० ते ३०,००० जेवणाचे डबे वितरीत करण्यासाठी सायकलचा वापर करतात. कंपनीच्या प्रकल्पांतर्गत ई-मोटारसायकलींचे वितरण करून विद्युतीकरण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

लॉर्ड्स ऑटोमेटिव्हचा उपक्रम कार्यक्षमता आणि वितरण सुलभतेच्या दृष्टीने डबेवाल्यांना केवळ सशक्त बनवत नाही तर संपूर्ण भारतभर हरित परिवहन उपायांना(ग्रीन मोबिलिटी सोल्यूशन्स) चालना हे लॉर्ड्स ऑटोमॅटिव्हच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. आमच्या लॉर्ड्स बिजली इलेक्ट्रिक मोटरसायकलसह शाश्वत शहरी परिवहनाचे भविष्य साकारण्यासाठी योगदान देण्यात आम्हाला अभिमान वाटतो, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीर सिंग यांनी सांगितले.

या उपक्रमावर भाष्य करताना, लॉर्ड्स ऑटोमेटिव्ह प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी वीर सिंग यांनी सांगितले की, मुंबईतील डबेवाल्यांना या वाहनांनी सुसज्ज करून, आम्ही केवळ जुन्या प्रणालीचे आधुनिकीकरण केवळ केलेले नाही, तर पर्यावरणपूरक वाहतूक उपायांनाही प्रोत्साहन दिले आहे. हा पथदर्शी प्रकल्प ग्रीन मोबिलिटीच्या माध्यमातून समुदायांना सक्षम बनवण्याच्या आणि आपल्या शहरांमधील कार्बन मात्रेवर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्याच्या आमच्या मोठ्या वचनबद्धतेची सुरुवात आहे, असेही कंपनीचे सीईओ वीर सिंग यांनी स्पष्ट केले.

लॉर्ड्स ऑटोमेटिव्ह प्रा. लि.ने इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) विशेष श्रेणी प्रस्तुत केली आहे. देशातील तेजीत असलेल्या ईव्ही क्षेत्रामध्ये बाजार अग्रणी म्हणून आपले स्थान मजबूत करण्यासाठी कंपनी प्रयत्नरत आहे. कंपनीने आतापर्यंत २७० हून अधिक विक्रेत्यांद्वारे २० राज्यांमध्ये २८,००० हून अधिक ईव्हींची विक्री केली आहे. याशिवाय केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये उत्पादन प्रकल्प उभारण्याची कंपनीची योजना आहे.