एसटीच्या ताफ्यात लवकरच २,५०० बसेस

ई-शिवनेरी बसमध्ये शिवनेरी सुंदरी

    02-Oct-2024
Total Views | 59
 
e-shivneri
 
मुंबई, दि. १ : (E- Shivneri Bus)“मुंबई-पुणे मार्गावर धावणार्‍या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवासुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल, अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे,” अशी माहिती एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या ३०४व्या बैठकीमध्ये दिली. यासोबतच नवीन २ हजार, ५०० साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे, तसेच १०० डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे, अशा विविध विषयांना या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.
 
एसटी महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली ३०४वी संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्यांच्या तब्बल ७० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी, मुंबई-पुणे मार्गावर धावणार्‍या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आली.
 
यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ एसटीच्या ३४३ बस स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. या दवाखान्यात अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशांबरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना विविध आरोग्य चाचण्या व औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी संबंधित संस्थांना बसस्थानकांवरील ४०० ते ५०० चौ.सेमी. एवढी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तेथे त्या संस्थेने आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब व औषध दुकान सुरू करून सेवा द्यायची आहे. यासह एसटी महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचतगटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन १० बाय १० आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 
या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व एसटी महामंडळाचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
 
चंद्रपुरात दोन नवे आगार
 
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आणि अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासीबहुल प्रदेशांमध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यात येणार आहेत. या आगारांच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या २५३ होणार आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
रविंद्रदादा चव्हाण : गौरव कार्यकर्त्याचा, विश्वास नेतृत्वाचा!

रविंद्रदादा चव्हाण : गौरव कार्यकर्त्याचा, विश्वास नेतृत्वाचा!

भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर हा अभिनंदनपर लेख लिहिताना अत्यंत आनंद होत आहे. ठाणे जिल्ह्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर भाजपमधून अनेक चांगले, संवेदनशील आणि तितकेच कार्यक्षम नेते दिले. त्यामध्ये रामभाऊ कापसे, जगन्नाथ पाटील, डॉ. अशोकराव मोडक अशी काही नावे सहज डोळ्यासमोर येतात. या सर्वांनी पक्षविस्तार केला, पक्षाची पाळेमुळे समाजामध्ये घट्ट केली आणि भारतीय जनता पक्षाची विचारधारा समाजातील सर्व स्तरांमध्ये रुजवली. परिणामी, अनेक लोक पक्षाशी जोडले गेले. याच पंक्तीमध्ये आता डोंबिवलीचे..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121