बाजारात आयपीओचा मोठा प्रवाह; गेल्या आठ महिन्यांत २२७ कंपन्यांचे आयपीओ दाखल

    02-Oct-2024
Total Views |
ipo-were-listed-indian-market
 
 
मुंबई :     देशातील भांडवली बाजारात आयपीओ जोरदार इंट्री पाहायला मिळत आहे. बाजारातील आयपीओमध्ये गेल्या आठ महिन्यांत तीन पटीने वाढ झाली आहे. ग्लोबल डेटानुसार, २०२४च्या पहिल्या आठ महिन्यांत भारतात २२७ कंपन्यांचे आयपीओ सूचीबध्द झाले असून बाजारात १२.२ बिलियन डॉलरदेखील जमा झाले आहेत. त्याचबरोबर, भारताच्या प्राथमिक बाजारपेठेत आता किरकोळ सहभागात वाढ होत आहे.


हे वाचलंत का? -     आता मुंबईतील डबेवाल्यांना मिळणार 'ई-मोटार'; 'लॉर्ड्स ऑटोमॅटिव्ह'चा पुढाकार!


दरम्यान, देशातील भांडवली बाजारात पहिल्या आठ महिन्यांत तीन पटीने वाढ दिसून आली आहे. तसेच, २०२३ मध्ये याच कालावधीत झालेल्या भांडवल उभारणीच्या जवळपास तिप्पट आहे. विशेष म्हणजे बेंचमार्क निर्देशांक दररोज नवीन उच्चांक गाठत असल्याने भारताचे दुय्यम बाजारदेखील तेजीत आहे. प्राथमिक बाजारपेठेतील वातावरणही गजबजले असून कामकाजातही तेजी दिसून येत आहे.

भारताच्या प्राथमिक बाजारपेठेत आता किरकोळ सहभागात वाढ होत आहे. यामागील कारण म्हणजे उच्च परतावा मिळण्याची शक्यता आणि आर्थिक बाजारपेठांमध्ये सहज प्रवेश यामुळे बाजारातील सहभागींची संख्या दिवसेंदिवस वाढतान दिसून येते. विशेष म्हणजे आतापर्यंत बाजारात दाखल झालेल्या १३ आयपीओंपैकी बजाज हाऊसिंग फायनान्स सर्वात मोठा आयपीओ ठरला.

लाइव्हमिंटच्या अहवालानुसार सप्टेंबरमध्ये ४७ कंपन्यांनी दुय्यम बाजारात पदार्पण केले असून एकत्रितपणे १६,१५२ कोटी रुपये बाजार भांडवल उभारणी केली. ४७ कंपन्यांनी आपयीओच्या माध्यमातून १६ हजार कोटी रुपये बाजार उभारणी केली असून ६१ टक्के इश्यू किमतीच्या वर सूचीबद्ध आहेत. ग्लोबल डेटाच्या अहवालानुसार, २०२४च्या पहिल्या आठ महिन्यांत भारतात २२७ कंपन्यांचे आयपीओ सूचीबद्ध झाले आहेत.