“तुम्ही महाराष्ट्राचे सुपुत्र”, ‘बिग बॉस’चे ‘ते’ शब्द ऐकताच सूरज झाला भावूक; म्हणाले, “फक्त गुलीगत पॅटर्न…”

    02-Oct-2024
Total Views |

suraj  
 
मुंबई : कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. दरवर्षी घरात शेवटच्या आठवड्यात स्पर्धेत टिकून राहिलेल्या सगळ्या स्पर्धकांना त्यांचा पहिल्या दिवसापासूनच्या ‘बिग बॉस’च्या घरातील त्यांचा संपूर्ण प्रवास दाखवला जातो. मात्र, यावर्षी यामध्ये एक ट्विस्ट आणण्यात आला आहे. यंदा हे सगळे स्पर्धक पहिल्यांदाच आपला प्रवास पाहण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घराबाहेर येणार आहेत. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर आणि अंकिता वालावलकर या स्पर्धकांचा प्रवास आपल्याला पाहायला मिळाला. आता नव्या भागात सूरज चव्हाणचा ‘बिग बॉस’च्या घरातील आजवरचा प्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे.
 
गुलीगत पॅटर्न आणि बुक्कीत टेंगूळ म्हणत सूरज चव्हाणने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला. आणि अल्पावधीतच त्याने महाराष्ट्राच्या लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली. सूरजचा चाहतावर्ग अजून वाढला आणि त्यामुळे बिग बॉसच्या घरातील त्याला अनपेक्षित प्रवास पडद्यावर पाहताना तो भावुक झाला.
 

suraj  
 
सूरजच्या प्रवासाविषयी ‘बिग बॉस’ म्हणाले, “आपण माझेच काय तर तुम्ही संबंध महाराष्ट्राचे सुपुत्र आहात… या सीझनमध्ये अनेक पॅटर्न पाहायला मिळाले. पण, या घरात गाजला फक्त गुलीगत पॅटर्न!” हा संपूर्ण प्रवास रुपेरी पडद्यावर पाहून सूरज प्रचंड भावुक झाला होता. त्याचे डोळे पाणावले होते. ‘झापुक झुपूक’ म्हणत या सोशल मीडिया स्टारने आपला प्रवास सेलिब्रेट केला.
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा महाअंतिम सोहळा ६ ऑक्टोबरला संपन्न होणार आहे. सध्या घरात ७ सदस्य असून यांच्यापैकी टॉप-५ मध्ये प्रवेश करून कोण ‘बिग बॉस’ची ट्रॉफी उंचावणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
 

suraj