पंतप्रधान नरेद्र मोदींकडून रजनीकांत यांच्या तब्येतीची चौकशी

    02-Oct-2024
Total Views |

rajinikanth 
 
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना सोमवारी ३० सप्टेंबर रोजी चेन्नईतील अपोलो रुग्णालयात पोटात तीव्र वेदना होत असल्यामुळे दाखल करण्यात आलं होतं. रजनीकांत लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी त्यांचे अनेक चाहते प्रार्थना करत आहेत. अशात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुपरस्टार रजनीकांत यांच्या तब्येतीची फोन करुन विचारपूस केली. मोदींनी रजनीकांत यांच्या पत्नी लता रजनीकांत यांना फोन करत थलैवांच्या तब्येतीची माहिती घेतली आणिच लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या.
दरम्यान, तामिळनाडूचे भाजप नेते के. अण्णामलाई यांनी रजनीकांत आणि त्यांची पत्नी लता यांचा पंतप्रधान मोदींसोबतचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले आहे की, "आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीमती लता रजनीकांत यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. त्यांनी सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत चर्चा केली. माननीय पंतप्रधानांना शस्त्रक्रियेनंतर रजनीकांत यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देण्यात आली आणि पंतप्रधानांनी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या".
 
 
 
याशिवाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन आणि मेगास्टार कमल हासन यांनीही यांनीही रजनीकांत यांना उत्तम आरोग्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महत्वाची अपडेट म्हणजे अपोलो हॉस्पिटल चेन्नईने रजनीकांतच्या प्रकृतीबाबत मेडिकल बुलेटिन जारी केले आहे. त्यात लिहिले आहे की, रजनीकांत यांना ३० सप्टेंबर २०२४ रोजी अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला हृदयाकडे जाणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीला सूज आली होती. ज्यावर ट्रान्सकॅथेटरद्वारे शस्त्रक्रिया न करता उपचार करण्यात आले. रजनीकांत आता स्थिर आणि निरोगी आहेत. दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे.