"सलमानने झुरळंही मारलं नाही", बिश्नोईच्या धमकीवर सलीम खान यांची प्रतिक्रिया

19 Oct 2024 12:13:56
 
Salim Khan
 
मुंबई : लॉरेन्स बिश्नोईने (Lawrence Bishnoi) सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे वृत्त आहे. मात्र आता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी सलमानला पाठीशी घालत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सलमानने आतापर्यंत किटकंही मारले नाही. आमचे कुटुंब कोणाचेही नुकसान करणार नाही असा विश्वास आहे असे ते म्हणाले आहेत. सलमानची यात काहीही एक चूक नसल्याने तो माफी मागत नसल्याचे सलीम खान म्हणाले आहे.
 
सलमानने माफी मागणार नसल्याचे सलीम खान यांनी स्पष्ट केले. सलीम खान पुढे म्हणाले की, माफी मागणे म्हणजे सलमानची चूक दिसून येणे असे त्याचे एकमेवर कारण असेल. सलमानने कधीही कोणत्याही प्राण्याला मारले नाही. आम्ही कधी झुरळही मारले नाही, आम्ही या गोष्टींवर विश्वास ठेवत नसल्याचे सलीम खान म्हणाले आहेत. अशा धमक्यांना आम्ही घाबरत नसल्याचे ते म्हणाले आहे.
 
लॉरेन्स बिश्नोई यांनी यापूर्वी सलमान खानला १९९८ च्या काळवीटाची शिकार केली होती. याप्रकरणात सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. बिश्नोई समाजाचा इतिहास पाहिला तर तो काळवीट, हरिण तसेच इतर प्राणी, पक्षांवर प्रेम करणारा समाज आहे.
 
सलीम खान यांनी केलेल्या वक्तव्याने सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र आता कोणत्याही दबावाखाली माफी मागणार नाही असे त्यांच्या कुटुंबियांनी स्पष्ट केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0